About Us

उसळीच्या रस्स्याचा रंग आहे न्यारा
त्यावर कांदा, लिंबू व फरसाणचा मारा
टायगर ब्रँड मसालाशिवाय मजाच नाही
मिसळ खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही
 
कोथिंबीर आणि मटकीने
आणली मिसळीत रंगत
टायगर मिसळ मसाला आणेल
तुमच्या चवीला गंमत…!

TIGER BRAND MASALA

भारतीय जेवण इतकं चवदार असतं कारण आपल्या जेवणांमध्ये वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर असतो. मन तृप्त करण्यास आणि एखादा पदार्थ पोटभर खाण्यास उद्युक्त करण्यासाठी पदार्थाला रंग, सुवास आणि चव बहाल करणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मसाला. खडे, सुके किंवा ताजे ओले मसाले असोत, भाज्यांना आणि पदार्थाना विविध प्रांतांत वेगळी चव प्राप्त होण्याचं मूलभूत कारण म्हणजे त्यामध्ये केलेल्या नानाविध मसाल्यांचा वापर. पण मसाल्यांचा वापर हा केवळ मुख्य जेवणातच केला जातो असं नाही. तर अनेक प्रकारचे भात, डाळी, गोड पदार्थ, चाट पदार्थ आणि पेयांमध्येही मसाल्यांची भूमिका तितकीच महत्त्वाची ठरते.

 

भोसरी येथे मोनिका बोथरा यांनी एक यशस्वी महिला उद्योजक होण्याच्या दृष्टीने मसाल्याचा व्यवसाय करण्याचे ठरविले. सुरुवातीला घरघुती मसाला बनवण्याचे कला अवगत केली. पुढे हाच व्यवसाय पुढे विकसित करण्याच्या हेतूने २००७ साली टायगर ब्रँड मसाला या नावाने बोथरा ट्रेंडिंग कंपनी मार्फत मसाला विक्री चालू केली. आतापर्यंत २० प्रकारच्या मसाल्याची निर्मिती केली असून टायगर ब्रँड मसाल्याला एक ब्रँड म्हणून स्थापित केलंय. मोनिका बोथरा यांना त्यांचे पती निलेश बोथरा आणि सासरे सुभाष बोथरा यांचे योग्य प्रकारे साथ मिळाली. टायगर ब्रँडचा मिसळ मसाला व स्पेशल कांदा लसूण मसाल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागणी आहे.

 

टायगर हे नाव गुणवत्ता, प्रमाण, समाधान आणि उत्कृष्ट चव यांचे प्रतीक आहे कारण असे म्हटले आहे की ‘चव अशी,तुम्हाला आवडेल तशी’ ही टॅगलाईन आमच्या ग्राहकांना नवीन अभिरुचीनुसार पुरवलेली प्रतिष्ठा आहे.

 

ग्राहकांच्या गरजेनुसार आणि त्यांच्या चवीनुसार आम्ही लक्ष केंद्रित करून आम्ही त्यांची पूर्तता करण्यासाठी आणि आमचा टायगर ब्रँड विकसित करण्यासाठी आज व उद्याची गरज आहे म्हणून प्रयत्न करत आहोत

Talk to us

Have any questions? We are always open to talk about and how we can help you.